Aditya L1 Mission Launch Date: चांद्रयान-३ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रो आता सूर्याचा अभ्यास करण्यास सज्ज झाले आहे. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी यापूर्वीच याबाबत माहिती दिली आहे. आता इस्रोने सूर्य मोहिमेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. आदित्य एल1 मिशनच्या प्रक्षेपण तारखेची घोषणा करताना, इस्रोने X वर पोस्ट केले की, मिशन 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11:50 वाजता प्रक्षेपित केले जाईल. ISRO ने सांगितले की, आदित्य-L1 हा श्रीहरिकोटा येथून सूर्याचा अभ्यास करणारा पहिला उपग्रह असेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)