ZIM vs PAK 2nd T20I: हरारे (Harare) येथे खेळल्या गेलेल्या दुसर्‍या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेने (Zimbabwe) दिलेल्या 119 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तान (Pakistan) संघ अवघ्या 99 धावांवर ऑलआऊट झाला. पाकिस्तान विरुद्ध टी-20 मध्ये झिम्बाब्वेचा हा पहिला विजय ठरला आहे. यापूर्वी त्यांना तब्बल  15 सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. या ऐतिहासिक विजयासह झिम्बाब्वेने तीन सामन्याच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. लक्ष्याच्या पाठलाग करताना पाकिस्तानने एकावेळी 78 धावांवर 3 विकेट गमावल्या पण अखेर पर्यंत ते अधिक धावाच जोडू शकले आणि 19.5 ओव्हरमध्ये 99 धावांवर संपूर्ण संघ तंबूत परतला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)