आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आगामी एकदिवसीय विश्वचषक (World Cup 2023) साठी 20 सामना अधिकार्‍यांची (ICC World Cup 2023 Umpires list) जाहीर केली आहे. या यादीत 16 पंच आणि 4 रेफरींचा समावेश आहे. आयसीसी पंचांच्या एमिरेट्स एलिट पॅनेलमधील सर्व पंच भारतातील विश्वचषकादरम्यान पदभार सांभाळणार आहेत. तसेच, स्पर्धेदरम्यान उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी अधिकारी घोषित केले जातील. भारताचे नितीन मेनन आणि श्रीलंकेचे कुमार धर्मसेना हे इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पहिल्या वनडे विश्वचषक सामन्यात पंच म्हणून असतील. तर अँडी पायक्रॉफ्ट हे सामनाधिकारी असतील. (हे देखील वाचा: Reserve Day for IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्याआधी आली जबरदस्त आनंदाची बातमी, आता होणार संपूर्ण सामना)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)