IND vs SL T20I & ODI Series: भारतीय संघाचा श्रीलंका दौरा 27 जुलैपासून सुरू होईल आणि 7 ऑगस्टला संपेल आणि यादरम्यान दोन्ही संघ तीन एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमध्ये आमनेसामने येतील. अलीकडेच श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत कोणत्या खेळाडूकडे कर्णधारपद द्यायचे हा मोठा प्रश्न समोर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि टी-20 विश्वचषक 2026 पुढील 2 वर्षांत होणार आहेत. त्यामुळे गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकाची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. अजून श्रीलंका मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झालेली नाही आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार गौतम गंभीरच्या विनंतीनुसार विराट कोहली श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. विराट कोहलीने बीसीसीआयला सांगितले की, गौतम गंभीरच्या विनंतीनुसार तो श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी उपलब्ध असेल कारण प्रशिक्षक म्हणून ही त्याची पहिली मालिका असेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)