LSG vs RR, IPL 2024 44th Match: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 44 वा (IPL 2024) सामना लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स (LSG vs RR) यांच्यात लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या मोसमातील ही दुसरी वेळ आहे, जेव्हा लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने आहेत. पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स पहिल्या स्थानावर आहे. त्याचबरोबर लखनौ सुपर जायंट्स 8 पैकी 5 सामने जिंकून 10 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी लखनौने राजस्थानसमोर 197 धांवांचे लक्ष्य ठेवले आहे. लखनौसाठी सलामीवीर केएल राहुलने सर्वाधिक 76 धावांची खेळी केली. राजस्थान रॉयल्सकडून संदीप शर्माने सर्वाधिक दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी राजस्थान रॉयल्स संघाला 20 षटकात 197 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थानला तिसरा धक्का लागला आहे. लखनौचा स्कोर 93/3
3️⃣ wickets for #LSG at the halfway stage 🙌#RR need 116 runs as Dhruv Jurel joins the skipper Sanju Samson
Follow the Match ▶️ https://t.co/Dkm7eJqwRj#TATAIPL | #LSGvRR pic.twitter.com/x9wVpMc2U6
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)