Digvesh Rathi Slapped Abhishek Sharma?: एकाना क्रिकेट स्टेडियमवर 19 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (LSG vs SRH)सामना पार पडला त्या सामन्यात अभिषेक शर्मा आणि दिग्वेश राठी यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. झालेला मैदानावरील संघर्ष हा आता सर्वात मोठा चर्चेचा विषय बनला आहे. दुसऱ्या डावात दिग्वेश राठीने (Digvesh Rathi) अभिषेक शर्माला 59 धावांवर बाद केल्यानंतर 'नोटबुक' सेलिब्रेशन केले. त्यावर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) भडकला. क्रिकेटपटूंमध्ये जोरदार वाद झाला आणि प्रकरण वाढू नये यासाठी संघातील खेळाडू आणि पंचांना हस्तक्षेप करावा लागला. यादरम्यान, आता झालेल्या भांडणात राठीने अभिषेक शर्माला कानाखाली मारल्याचे दावे करण्यात आले आहेत. मात्र ते खोटे आहेत. सामन्यानंत दोन्ही क्रिकेटपटूंनी एकमेकांशी हस्तांदोलन केले आणि संवादही साधला. मैदानावर घडलेला प्रकार मागे टाकल्याचे दिसून आले. यावेळी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला देखील घटनास्थळी उपस्थित होते. अनेक वृत्तसंस्थांनी अभिषेक शर्माला थप्पड मारल्याचा खळबळजनक दावा केला आहे. मात्र, तो खोटा आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)