India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Match Scorecard: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (India National Cricket Team) विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. त्याआधी, दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला. बांगलादेशने पहिल्या डावात 3 गडी गमावून 107 धावा केल्या आहेत. पावसामुळे पहिल्या दिवसाच्या खेळावरही परिणाम झाला. मात्र दुसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकता आला नाही. दरम्यान, 10 वाजता पाहणीसाठी आलेले पंच मैदानाच्या स्थितीवर खूश नाहीत, पुढील पाहणी 12 वाजता होणार आहे. दोन्ही संघ अद्याप मैदानात आले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
UPDATE: Next inspection to take place at 12 PM IST.#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank https://t.co/KWGXNocfLD
— BCCI (@BCCI) September 29, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)