आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 नंतर (ICC World Cup 2023) टीम इंडियाला आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. यानंतर टीम इंडिया डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका (IND vs SA) दौऱ्यावर जाणार आहे. जिथे टीम इंडियाला दोन कसोटी, तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. ज्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिका दौरा 10 डिसेंबरपासून सुरू होणार असून 7 जानेवारीपर्यंत चालणार आहे. 10, 12 आणि 14 डिसेंबर रोजी टी-20 सामने खेळवले जातील. यानंतर 17, 19 आणि 21 डिसेंबर रोजी एकदिवसीय सामने होणार आहेत. पहिला कसोटी सामना 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये तर दुसरा कसोटी सामना 3 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये सुरू होईल. (हे देखील वाचा: IND vs AFG T20 Series 2023: भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 सामन्याचे वेळापत्रक जाहीर, कधी आणि कुठे होणार सामने? घ्या जाणून)
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका
पहिला टी-20 - 10 डिसेंबर, डर्बन
दुसरा टी-20 - 12 डिसेंबर, केबेरा
तिसरा टी-20 - 14 डिसेंबर, जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका
पहिली वनडे- 17 डिसेंबर, जोहान्सबर्ग
दुसरी वनडे- 19 डिसेंबर, केबेरा
तिसरी एकदिवसीय- 21 डिसेंबर, पार्ल
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका
पहिली कसोटी- 26 ते 30 डिसेंबर, सेंच्युरियन
दुसरी कसोटी - 3 ते 7 जानेवारी, केपटाऊन
No summer like a 𝘾𝙍𝙄𝘾𝙆𝙀𝙏 summer !
Get ready to witness some pulsating cricket when India tour Mzansi 🇿🇦🇮🇳
Be part of every moment by purchasing your tickets on TicketsPro https://t.co/011CQXFwEW 🎟 #WozaNawe #BePartOfIt #SAvND pic.twitter.com/tuh0qc8Mvb
— Proteas Men (@ProteasMenCSA) November 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)