मालिकेपूर्वी (IND vs AUS) भारतीय संघाचे सराव सत्र सुरु झाले आहे. विराट कोहली, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रोहित शर्मा आणि टीम इंडियाचे इतर टेस्ट स्टार 14 मार्चला मुंबईत पोहोचले. रोमहर्षक कसोटी मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेला 17 मार्चपासून मुंबईत सुरुवात होणार आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी एक वैकल्पिक सराव सत्र 15 मार्च रोजी आयोजित करण्यात आले होते. विशेष म्हणजे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. वानखेडे स्टेडियमवर त्याच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टीम इंडियाचा कर्णधार असेल. दरम्यान हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आज वानखेडेवर सराव करत आहे.
Team India calling 🇮🇳 Let’s go ✌️❤️ pic.twitter.com/rPMPr3INyC
— hardik pandya (@hardikpandya7) March 16, 2023
Hello and welcome to the Wankhede Stadium, where #TeamIndia will kickstart the ODI series against Australia.#INDvAUS @mastercardindia pic.twitter.com/OXt3tuOS14
— BCCI (@BCCI) March 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)