मुंबई-अहमदाबाद दरम्यान वंदे भारत च्या स्लीपर ट्रेनची ट्रायल रन आज पार पडली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यान ही ट्रायल झाली आहे. या ट्रेन मध्ये 16 कोच असणार आहे. 11 कोच हे एसी 3 टिअर कोच, 4 एसी 2 टिअर कोच आणि एक फर्स्ट एसी कोच आहे. या सार्‍यांमध्ये अ‍ॅडव्हांस फीचर्स असणार आहेत. स्वतंत्र चार्जिंग पोर्ट्स असतील टाईप ए आणि सी डिव्हाईस साठी चार्जिंग पॉईंट्स असतील. फोल्डेबल स्नॅक टेबल आहे आणि इंटिग्रेटेड लाईटिंग सिस्टिम तसेच लॅपटॉप चार्जिंग सेटअप आहे.

वंदे भारतच्या स्लीपर कोच ट्रेनचं ट्रायल रन  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)