क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या सध्या अलिबाग मध्ये घरी लगबग सुरू आहे. त्यांच्या नव्या घरी गृह प्रवेशाची तयारी सुरू आहे. अशी चर्चा आहे. सध्या त्याचे काही व्हिडिओ वायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी अनुष्का, विराट देखील गेटवे ऑफ इंडिया मधून फेरी बोटने अलिबागला जाताना दिसले आहेत. या विराट अनुष्काचे नवीन घर गेल्या काही काळापासून चर्चेचा विषय बनला आहे. 2023 मध्ये, विराट कोहलीने अलिबागमधील आवस लिव्हिंगमध्ये 2,000 चौरस फुटांचा व्हिला तब्बल 6 कोटी रुपयांना खरेदी केला. भारताच्या माजी कर्णधाराने मुद्रांक शुल्कासाठी 36 लाख रुपये देखील दिले आहेत.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)