Weather Forecast

मकर संक्रांतीच्या सणापासून उत्तरायणाला (Uttarayan) सुरूवात होते. आता हळूहळू थंडी कमी होत उष्णता वाढायला सुरूवात होते. उत्तर भारतामध्ये सध्या हिमवर्षाव सुरूच असल्याने थंडी जाणवत असली तरीही महाराष्ट्रात उकाडा वाढला आहे. कमाल तापमान वाढलं असून महाराष्ट्राच्या काही भागात अधून मधून पावसाच्या सरी देखील बरसत आहेत. दिवसा उकाडा आणि रात्री थोडं थंड वातावरण आहे.

महाराष्ट्रात ढगाळ वातावारण

महाराष्ट्रात आयएमडी च्या अंदाजानुसार सध्या ढगाळ वातावरण आहे. सध्या नाशिक, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा भागात पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वार्‍यांची स्थिती बदलली आहे. परिणामी तापमानामध्ये चढ-उतार होत असल्याचं दिसून येत आहे.

राज्यात मागील 24 तासांमध्ये निच्चांकी तापमानामध्येही वाढ झाली आहे. सर्वाधिक तापमान 34 अंशादरम्यान आहे.

विदर्भातील हवामान अंदाज

आजचं पुण्यातील तापमान

राज्यात एकूणचा किमान तापमान 3 ते 6 अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. हवामानातील या चढ उताराचा परिणाम आरोग्यावरही होताना दिसत आहे. अनेकांना सर्दी, पडसे, ताप जाणवत आहे.