जामखेड मध्ये चार चाकी वाहन विहीर पडून अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. विहीरीला कठडा किंवा पायर्या नसल्याने गाडी मागे घेत असताना हा अपघात झाला आहे. मृतांमध्ये अशोक विठ्ठल शेळके (वय 29) रामहरी गंगाधर शेळके (वय 35), किशोर मोहन पवार (वय 30) आणि चक्रपाणी सुनिल बारस्कर (वय 25) यांचा समावेश आहे. ही घटना संध्याकाळी साडेचार वाजता घडली आहे. जामवाडी गावात रस्त्याचे काम सुरू होते त्यामुळे रस्त्यावर खडी टाकलेली होती. यामुळे वाहनचालकाला अंदाज न आल्याने गाडी खाली विहीर गेली. विहीरही खोल असल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दल, पोलिस तेथे पोहचले. त्यांनी चौघांचेही मृत्यू बाहेर काढले. हॉस्पिटल मध्ये चौघांनाही मृत घोषित केल्यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. सामाजिक संस्थांनी आणि प्रशासनाने पीडित कुटुंबीयांना आर्थिक आणि मानसिक आधार देण्याचे आवाहन केले आहे.
रोहित पवार यांची श्रद्धांजली
जामखेड (जामवाडी) येथील रामहरी गंगाधर शेळके, अशोक विठ्ठल शेळके, किशोर मोहन पवार आणि चक्रपाणी सुनील बारस्कर यांचा अपघाती मृत्यू झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. या कठीण प्रसंगी या सर्वांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख पचवण्याची शक्ती त्यांच्या… pic.twitter.com/mGqGTaAEnA
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 15, 2025
रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये आता जामखेड मधील ही एक घटना हृद्य हेलावणारी आहे. जांब गाव रस्त्यावर बोलेरो गाडीचा रस्त्यावर पडलेल्या खडीवरुन गाडीचे नियंत्रण सुटल्याने झालेला हा अपघात पुन्हा रस्त्याच्या खराब अवस्थेचा प्रश्न कसा जीवावर बेतू शकतो हे दाखवून देणारा ठरला आहे.
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील या घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांना आपली श्रद्धांजली अर्पण करणारी पोस्ट X वर शेअर केली आहे.