राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Rohit Pawar Viral Video) झाला आहे. अर्थात हा व्हिडिओ रोहित पवार यांनी स्वत:च आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आमदार रोहित पवार हे 'सैराट' (Sairat Movie) चित्रपटातील 'झिंग.. झिंग.. झिंगाट' (Zingat ) गाण्यावर उपस्थितांसोबत ठेका धरताना दिसत आहेत. निमित्त ठरले अहमदनगर जिल्ह्यातील गायकरवाडी (Gaikarwadi) येथील कोविड सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमाचे. कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून गायकरवाडी येथे कोरोना सेंटर उभारण्यात आलेआहे. या कोविड सेंटर्समध्ये कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांचा ताण काहीसा हलका व्हावा. यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्या आले होते. या वेळी डिजेच्या तालावर रुग्णाच्या नातेवाईकांनी ठेका धरला. उपस्थितांचा उत्साह वाढविण्यासाठी मग रोहित पावर यांनीही काहीसा ठेका धरत उपस्थितांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला.
आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेड या त्यांच्या मतदारसंघातील गायकरवाडी येथील केव्हीड सेंटरला भेट दिली. रोहित पवाह यांनी या कोविड सेंटरला सोमवारी (24 मे) दिलेली भेट कोविड संक्रमित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी बरीच उत्साहजणक ठरली. त्यांनी कोरोना रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाध साधला. त्यांना धीर दिला. तसेच, उपस्थित डॉक्टर्स आणि वॉर्डबॉय, परिचारीका आणि त्यांच्यासोबत इतर कर्मचाऱ्यांचीही अस्थेने विचारपूस केली. (हेही वाचा, PPE किट घालून विवाहसोहळ्यात व्यक्तीचा जबरदस्त डान्स; पहा व्हायरल व्हिडिओ)
रोहित पवार ट्विट
गायकरवाडी (कर्जत) येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांमध्ये असलेलं गंभीर वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी गायक तुषार घोडके यांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी त्यांच्या 'झिंगाट' गाण्यावर तिथल्या आजींनीही ठेका धरला आणि आणि नकळत मीही त्यांच्यात सहभागी झालो. pic.twitter.com/EuniVa8FU6
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 24, 2021
दरम्यान, गायकरवाडी येथील केव्हीड सेंटरला भेट दिल्यानंतर रोहित पवार यांनी या वेळी काही रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी डिजेच्या तालावर ठेका धरला. रोहित पवार हे आपल्या मतदारसंघात नेहमीच कार्यरत असतात. त्यासोबतच ते सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असतात. प्रादेशिक आणि राष्ट्रीय अनेक विषयांवर, प्रसंगावर ते प्रतिक्रिया देतात.