भारतीय माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर 'मिडविकेट स्टोरीज' मध्ये मुख्य सल्लागार म्हणून सामील झाले आहेत. याबाबत बोलताना गावसकर यांनी ‘मिडविकेट स्टोरीज’ संकल्पना समजावून सांगितली. ते म्हणाले, ‘मिडविकेट स्टोरीजमध्ये माजी खेळाडू एकत्र येतील आणि तिथे त्यांच्या काळाबद्दल, त्यांच्यावेळी घडलेल्या गोष्टींबद्दल बोलतील. या ठिकाणी एक अँकर असेल जो प्रश्न विचारेल. पूर्वी अशा गोष्टी सार्वजनिक माध्यमांमध्ये मांडण्याची उपलब्धता नव्हती. त्यामुळे आता 'मिडविकेट स्टोरीज'द्वारे प्रेक्षकांना अशा मैदानातील आणि मैदानाबाहेरील आठवणी ऐकायला मिळतील.’
ते पुढे म्हणाले, ‘ही एक मनोरंजक संकल्पना आहे. मी आधी अशा दोन कार्यक्रमांचा भाग होतो, एक सिडनीमध्ये अॅलन बॉर्डरसोबत आणि दुसरा या वर्षाच्या सुरुवातीला मार्चमध्ये व्हिव्ह रिचर्ड्ससोबत.’ मिडविकेट स्टोरीजचे संस्थापक निशांत दयाल आणि सह-संस्थापक जया प्रसाद यांनी विंडीजचे सुपरस्टार, 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेल आणि 'टर्बनेटर' हरभजन सिंग या नामवंत जोडीला यजमान भारत आणि श्रीलंका यांच्यातील विश्वचषक स्पर्धेच्या आधी मुंबईत भारताच्या पहिल्या टप्प्यातील कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. (हेही वाचा: KL Rahul आशिया कप मध्ये पहिल्या दोन मॅच मधून बाहेर -Rahul Dravid ची माहिती)
#WATCH | Mumbai: "The concept of Mid-Wicket Stories is where former players come together and talk about their times...At that particular time there was not the kind of availability of putting those stories out like it is there today in the public medium, so many platforms are… pic.twitter.com/sTDo18P1rw
— ANI (@ANI) August 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)