SRH vs DC IPL 2021 Match 20: आयपीएलच्या (IPL) 20व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत 4 विकेट गमावून निर्धारित 20 ओव्हरमध्ये 159 धावांपर्यंत मजल मारली आणि सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) विजयासाठी 160 धावांचं लक्ष्य दिलं आहे. दिल्लीसाठी पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) सर्वाधिक 53 धावांची अर्धशतकी खेळी केली तर कर्णधार रिषभ पंतने (Rishabh Pant) 37, आणि शिखर धवनने 28 धावांचे योगदान दिले. शिवाय, दिल्लीसाठी स्टिव्ह स्मिथ 34 धावा आणि मार्कस स्टोइनिस 2 धाव करून नाबाद परतले. दुसरीकडे, हैदराबादसाठी वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच राशिद खानला 1 विकेट मिळाली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)