टिम इंडिया पुढच्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत दाखल होणार असून 10 तारखेला दोन्ही संघात पहिला T20 सामना हा खेळला जाणार आहे. साऊथ आफ्रिका हा भारत विरोधात कसोटी, T20 आणि एकदिवसीय मालिका हा खेळणार आहे,यावेळी एडन मार्करमकडे मोठी जबाबदारी देण्यात आली असून T20 आणि एकदिवसीय सामन्यासाठी त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी ही देण्यात आली आहे. तर टेंबा बबूमाकडे कसोटी संघाची जबाबदारी ही देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गर आणि फलंदाज डेव्हिड बेडिंगहॅम आणि ट्रिस्टन स्टब्स यांना भारताविरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघात प्रथमच स्थान मिळाले; यष्टिरक्षक काइल व्हेरेनला परत बोलावण्यात आले आहे. (हेही वाचा - India Beat Australia: रोमहर्षक सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी केला पराभव, मालिका 4-1 ने जिंकली)

पाहा दक्षिण आफ्रिकेचा संघ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)