भारतीय संघाला उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर टीम इंडियावर सर्वत्र टीका होत आहे. रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इंग्लंडविरुद्धच्या दारूण पराभवानंतर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) पहिलं विधान केलं आहे. त्याने टीम इंडियासाठी (Team India) मोठी गोष्ट सांगितली आहे. भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर म्हणाला, 'तुम्ही फक्त एका सामन्याच्या आधारे भारतीय संघाच्या कामगिरीचा न्याय करू शकत नाही. आपन टी-20 क्रिकेटमधला नंबर वन संघ आहोत. हे एका रात्रीत घडत नाही. येथे पोहोचण्यासाठी दीर्घकाळ चांगले क्रिकेट खेळावे लागते. खेळाडूंनाही बाहेर जाऊन अपयशी व्हायचे नव्हते. खेळात चढ-उतार येतच राहतात. यामध्ये आपण एकत्र असायला हवे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)