MI vs DC: आयपीएल 2024 मध्ये, (IPL 2024) हार्दिक पांड्याच्या टीम मुंबई इंडियन्सला सलग तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता परंतु 7 एप्रिल रोजी मुंबईने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (MI vs DC) या हंगामातील पहिला विजय नोंदवला. या मोसमातील पहिला विजय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा, प्रत्येक खेळाडू आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी साजरा केला. या विजयानंतर हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सामना संपल्यानंतर रोहित शर्माने ड्रेसिंग रुममध्ये संघातील सर्व खेळाडूंना जोश दिला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडिओ
A 𝐑𝐨 special at Wankhede. A 𝐑𝐨 special in the dressing room. 🎖️💙#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #MIvDC | @ImRo45 pic.twitter.com/b555HUvVdE
— Mumbai Indians (@mipaltan) April 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)