टी-20 विश्वचषक 2022 नंतर, विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी एकही आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळलेला नाही. हार्दिक पांड्या टी-20 मध्ये कर्णधार होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत पुढील वर्षी जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत संयुक्तपणे होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत दोन्ही खेळाडू खेळण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रोहित 2024 टी-20 वर्ल्ड कपबद्दल बोलताना दिसत आहे. ज्यावर रोहित म्हणतो, "फक्त जाणे आणि मजा करणे याशिवाय, येथे येण्याचे आणखी एक कारण आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की विश्वचषक येत आहे, जूनमध्ये टी-20 विश्वचषक होणार आहे. त्यामुळे, मला खात्री आहे की प्रत्येकजण उत्साहित आहे. तर हो

य, आम्ही त्याची वाट पाहत आहोत," आता रोहितच्या या विधानानंतर चाहत्यांना अपेक्षा आहे की रोहित शर्मा 2024 चा टी-20 विश्वचषक खेळू शकेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)