Netherlands Beat United States, 6th T20I Match Scorecard: अटीतटीच्या सामन्यात नेदरलँड्सने अमेरिकेचा 4 धावांनी केला पराभव, तिरंगी मालिकेवर केला कब्जा; सामन्याचे स्कोअरकार्ड येथे पाहा
नेदरलँड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध युनायटेड स्टेट्स राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील त्रिकोणी मालिकेतील सहावा टी-20 सामना आज म्हणजेच 28 ऑगस्ट रोजी वूरबर्ग येथील स्पोर्टपार्क डुवेस्टीजन येथे खेळवला गेला. या सामन्यात नेदरलँडसे अमेरिकेचा 4 धावांनी पराभव केला आहे.
Netherlands National Cricket Team Beat United States National Cricket Team: नेदरलँड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध युनायटेड स्टेट्स राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील त्रिकोणी मालिकेतील सहावा टी-20 सामना आज म्हणजेच 28 ऑगस्ट रोजी वूरबर्ग येथील स्पोर्टपार्क डुवेस्टीजन येथे खेळवला गेला. या सामन्यात नेदरलँडसे अमेरिकेचा 4 धावांनी पराभव केला आहे. तत्पूर्वी, सहाव्या सामन्यात नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या नेदरलँड संघाने 20 षटकात 8 गडी गमावून 132 धावा केल्या. नेदरलँड्ससाठी स्टार अष्टपैलू रायन क्लेनने नाबाद 36 धावांची शानदार खेळी केली. रायन क्लेनशिवाय मॅक्स ओ'डॉडने 27 धावा केल्या. दुसरीकडे, अमेरिकेसाठी हरमीत सिंगने सर्वाधिक तीन बळी घेतले. हरमीत सिंगशिवाय जसदीप सिंगने दोन विकेट्स घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी अमेरिकेच्या संघाला 20 षटकात 133 धावा करायच्या होत्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या अमेरिकेचा संघ 20 षटकात सर्वबाद 128 धावा करु शकला. अमेरिकेसाठी स्टार फलंदाज अँड्रिस गूसने 44 धावांची सर्वोत्तम खेळी केली. अँड्रिज गुसशिवाय सलामीवीर सैतेजा मुक्कामल्लाने 24 धावा केल्या. नेदरलँड्सकडून आर्यन दत्तने सर्वाधिक तीन बळी घेतले. आर्यन दत्तशिवाय डॅनियल डोरमने दोन बळी घेतले.
So close 💔
Efforts fall short on the field as The Netherlands wins the final T20i by 4 runs. #USAvNED pic.twitter.com/3uiuye7T1w
— USA Cricket (@usacricket) August 28, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 28, 2024 08:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

