IND vs SL 2nd ODI: रोहित शर्माने (Rohit Sharma) श्रीलंकेविरुद्ध खेळल्या (IND vs SL) गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सलग दुसरे अर्धशतक झळकावले. जवळपास महिनाभरानंतर मैदानात परतलेला रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आला. भारतीय कर्णधाराने 44 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 64 धावांची आक्रमक खेळी केली. या अर्धशतकी खेळीसह रोहित शर्माने भारताचा माजी फलंदाज 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मोठा विक्रम मोडला आहे. खरे तर भारतासाठी सलामीवीर म्हणून सर्वाधिक 50 प्लस हून अधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. आता रोहित शर्माने सचिन तेंडुलकरचा हा विक्रम मोडीत काढला आहे.
भारतासाठी सलामी करताना सर्वोच्च 50 प्लस स्कोअर
रोहित शर्मा- 121
सचिन तेंडुलकर- 120
Rohit Sharma has most fifty plus scores as an Indian opener in international cricket. 🚨 pic.twitter.com/WDwnku7YgS
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)