इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 27 वा सामना आज पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. आयपीएलच्या 16व्या हंगामात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आतापर्यंत पाच सामने झाले आहेत. ज्यामध्ये पंजाब किंग्जने पाचपैकी तीन सामने जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेही पाचपैकी दोन सामने जिंकले असून तीन सामन्यांत संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने निर्धारित 20 षटकांत 4 गडी गमावून 174 धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी सलामीवीर फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक 84 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून हरप्रीत ब्रारने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. पंजाब किंग्जला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 175 धावा करायच्या आहेत.
Match 27. WICKET! 18.6: Dinesh Karthik 7(5) ct Atharva Taide b Arshdeep Singh, Royal Challengers Bangalore 163/4 https://t.co/CQekZNsh7b #TATAIPL #PBKSvRCB #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)