RR vs RCB, IPL 2024 19th Match: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) च्या 19 व्या सामन्यात शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना राजस्थान रॉयल्सशी (RCB vs RR) होणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर (Jaipur Sawai Mansingh Stadium) हा सामना होणार आहे. लीगमधील दोन्ही संघांच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर नजर टाकली तर राजस्थान रॉयल्सने सर्व 3 सामने जिंकले आहेत आणि संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, आरसीबीने 4 पैकी फक्त 1 सामना जिंकला आहे आणि 3 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सौरव चौहान, रीस टोपले, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)