KKR vs PBKS, IPL 2024: आज आयपीएल 2024 चा 42 वा (IPL 2024) सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज (KKR vs PBKS) यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens, Kolkata) मैदानावर खेळवला गेला. या चुरशीच्या लढतीत पंजाबने कोलकाताचा 8 विकेट राखून पराभव केला आहे. तत्तपुर्वी, पंजाब किंग्जने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजी करताना केकेआरने पंजाबसमोर 262 धांवांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. केकेआरकडून सुनील नरेन 71 तर साॅल्ट सर्वाधिक 75 धावा केल्या आहे. दुसरीकडे, पंजाबकडून अर्शदीपने दोन विकेट घेतल्या आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्ज संघाने अवघ्या 18.4 षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. पंजाब किंग्जकडून सलामीवीर जॉनी बेअरस्टोने नाबाद 108 धावांची तुफानी शतकी खेळी केली. कोलकाता नाईट रायडर्सकडून सुनील नारायणने सर्वाधिक एक विकेट घेतली.
The greatest T20 chase ever? #KKRvPBKS #IPL2024
👉 https://t.co/o4qEyoTUjR pic.twitter.com/DsjqPmJgTq
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 26, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)