WPL 2024 च्या 14 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सचा 42 धावांनी पराभव (MI Beat UP) केला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने नॅट सायव्हर-ब्रंटच्या 45 धावांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर 20 षटकांत 6 गडी गमावून 160 धावा केल्या. ज्याच्या प्रत्युत्तरात यूपी वॉरियर्स संघ केवळ 118 धावा करू शकला आणि सामना 42 धावांनी गमावला. यूपी वॉरियर्सचा या मोसमातील हा चौथा पराभव आहे. मुंबई इंडियन्सचा या मोसमातील हा चौथा विजय आहे. यासह मुंबई इंडियन्स पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. तर आरसीबी तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. (हे देखील वाचा: Harleen Deol Out Of WPL 2024: हरलीन देओल दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर, गुजरात जायंट्सला मोठा धक्का)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)