WPL च्या मध्यात गुजरात जायंट्सला (GG) मोठा धक्का बसला आहे. संघाची अव्वल खेळाडू हरलीन देओल (Harleen Deol) गुडघ्याच्या दुखापतीमुळे उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडली आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, हरलीन यापुढे उर्वरित स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही. तिच्या जागी विदर्भाची फलंदाज भारती फुलमाळीला बदली खेळाडू म्हणून पाचारण करण्यात आले आहे. हरलीनने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यापूर्वी 6 मार्चला संघासोबत सराव केला होता. यापूर्वी, बेंगळुरूमध्ये यूपी वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना हरलीनच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. यानंतर तिला लगेच मैदान सोडावे लागले. त्यानंतरच ही अष्टपैलू खेळाडू मैदानात आली नाही. (हे देखील वाचा: WPL 2024 Points Table: मुनी आणि लॉरा यांच्या जबरदस्त भागीदारीमुळे गुजरातला मिळाला पहिला विजय, जाणून घ्या पॉइंट टेबलची स्थिती)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)