WPL 2024 Points Table: मुनी आणि लॉरा यांच्या जबरदस्त भागीदारीमुळे गुजरातला मिळाला पहिला विजय, जाणून घ्या पॉइंट टेबलची स्थिती

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर गुजरात जायंट्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 199 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीला आठ गडी गमावून केवळ 180 धावा करता आल्या.

WPL 2024 Points Table: मुनी आणि लॉरा यांच्या जबरदस्त भागीदारीमुळे गुजरातला मिळाला पहिला विजय, जाणून घ्या पॉइंट टेबलची स्थिती
gujarat giants (Photo - X)

WPL 2024 Points Table: महिला प्रीमियर लीगच्या 12व्या (WPL 2024) सामन्यात गुजरात जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर 19 धावांनी विजय (GG Beat RCB) मिळवला. बेथ मूनीच्या नेतृत्वाखालील संघाने मंधानाच्या आर्मीविरुद्ध लीगमधील पहिला विजय नोंदवला. मात्र, गुजरातच्या या विजयामुळे गुणतालिकेत कोणताही बदल झालेला नाही. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर गुजरात जायंट्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 199 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीला आठ गडी गमावून केवळ 180 धावा करता आल्या. या सामन्यात जॉर्जिया वेअरहॅम व्यतिरिक्त कोणतीही महिला फलंदाज आरसीबीसाठी विशेष काही दाखवू शकली नाही. तिने 22 चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 48 धावा केल्या. मात्र, तिला या डावाचे अर्धशतकात रूपांतर करता आले नाही. (हे देखील वाचा: IND vs ENG 5th Test Live Streaming: शेवटच्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 07, 2024 08:59 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).