Mayank Agarwal Admitted in Hospital: बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघातून बाहेर असलेला कर्नाटकचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवालबाबत मोठी बातमी समोर येत आहे. नवी दिल्लीला जाणाऱ्या विमानात आजारी पडल्यानंतर त्याला आगरतळा येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्य क्रिकेट असोसिएशनच्या सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे. अहवालानुसार, उड्डाण करण्यापूर्वीच मयंकची प्रकृती खालावली. मयंक रणजी सामना खेळून आगरतळाहून परतत होता, परंतु विमानात चढताच त्याला अस्वस्थ वाटू लागले. मयंकने पिण्याचे पाणी असल्याच्या बाटलीतील द्रवपदार्थ पिल्यानंतर पोटदुखी तसेच घशात आणि तोंडात जळजळ झाल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करून उपचार सुरु करण्यात आले. आता बातमी आली आहे की मयंकला कोणत्याही प्रकारचा धोका नसून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. (हेही वाचा: India Vs England 2nd Test: 4 दिग्गजांशिवाय टीम इंडिया खेळणार इंग्लंडविरोधातील दुसरी कसोटी, असा असेल भारताचा संभाव्य संघ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)