आयपीएल 2024 चा 10 वा सामना शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (RCB vs KKR) यांच्यात होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळतील. आकडेवारीच्या बाबतीत, केकेआरचा आरसीबीवर वरचष्मा आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 32 सामने खेळले गेले आहेत. यापैकी केकेआरने 18 तर आरसीबीने 14 सामने जिंकले आहेत. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्रथम फलंदाजी करणार आहे.
कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रमणदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.
🚨 Toss 🚨@KKRiders win the toss and elect to field against @RCBTweets
Follow the Match ▶️ https://t.co/CJLmcs7aNa #TATAIPL | #RCBvKKR pic.twitter.com/hUcwrrKilK
— IndianPremierLeague (@IPL) March 29, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)