KKR vs PBKS, IPL 2024: आज आयपीएल 2024 चा 42 वा (IPL 2024) सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज (KKR vs PBKS) यांच्यात होणार आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens, Kolkata) मैदानावर खेळवला जाणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स संघ चालू हंगामात चमकदार कामगिरी करत आहे. संघाने 5 सामने जिंकले असून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे शिखर धवनच्या अनुपस्थितीत पंजाब किंग्जने सलग सामने गमावले आहेत. पंजाबची कमान सॅम कुरनच्या हाती असली तरी त्यालाही संघाच्या कामगिरीत सुधारणा करता आलेली नाही. पंजाब किंग्जने 8 सामने खेळले असून त्यांना फक्त दोनच सामने जिंकता आले आहेत. संघ 4 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जाईल. तर मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर पाहता येईल.
The Knights and Kings prep up for another run-fest at Eden 🔥✅
Watch #KKRvPBKS, 6:30 PM onwards, for FREE only with #IPLonJioCinema#TATAIPL | @KKRiders | @PunjabKingsIPL pic.twitter.com/AjGvRisrDG
— JioCinema (@JioCinema) April 26, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)