LSG vs RR: लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात मोठी कामगिरी केली आहे. अर्धशतकी खेळी खेळणाऱ्या केएलने सलामीवीर फलंदाज म्हणून आयपीएलमध्ये आपल्या 4000 धावा पूर्ण केल्या आहेत. आयपीएलमध्ये 4000 धावा पूर्ण करणारा केएल राहुल हा केवळ पाचवा सलामीवीर ठरला आहे. याआधी आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीसह डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन आणि ख्रिस गेल यांनी ही कामगिरी केली आहे.

आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून 4000 धावा करणारे फलंदाज

6362 - शिखर धवन

5909 - डेव्हिड वॉर्नर

4480 - ख्रिस गेल

4041 – विराट कोहली

4010 - केएल राहुल

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)