India ‘A’ Squad vs England Lions: जिथे बीसीसीआय (BCCI) आगामी अफगाणिस्तान (AFG) आणि इंग्लंड (ENG) मालिकेसाठी संघ जाहीर करण्याची वाट पाहत आहे तिथे शनिवारी दुपारी बीसीसीआयने भारतीय अ संघाचा संघ (A Squad) जाहीर केला आहे. भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी सराव सामन्यांमध्ये हा संघ इंग्लंड लायन्सचा (England Lions) सामना करेल. बीसीसीआयने या संघात सरफराज खान (Sarfraz Khan) आणि रजत पाटीदार (Rajat Patidar) यांना स्थान दिले आहे. अभिमन्यू इसवरन यांच्याकडे या संघाची कमान सोपवण्यात आली आहे. याशिवाय टीम इंडियाकडून खेळलेला नवदीप सैनीही या संघाचा एक भाग आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे रणजीमध्ये स्वत:ला सिद्ध करणाऱ्या रिंकू सिंगला संघात स्थान मिळालेले नाही. केएस भरत हा या संघाचा एक भाग आहे. तसेच ध्रुव जुरेलची दुसरा यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. (हे देखील वाचा: Sunil Gavaskar ने Rohit Sharma आणि Virat Kohli चे केले कौतुक, क्षेत्ररक्षणाबाबत दिले मोठे वक्तव्य)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)