India National Cricket Team vs Australia Men's Cricket Team: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) 5 सामन्यांचा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Border-Gavaskar Trophy 2024-25) पहिला सामना पर्थमध्ये खेळवला जात आहे. चौथ्या दिवसाची सुरुवात भारतासाठी उत्कृष्ट झाली. मोहम्मद सिराजने दिवसाच्या दुसऱ्याच षटकात उस्मान ख्वाजाला बाद केले. यानंतर त्याने स्टीव्ह स्मिथला आपला शिकार बनवले. लंच ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 5 विकेट गमावून 104 धावा आहे. भारताच्या विजयात ट्रॅव्हिस हेड पुन्हा डोकेदुखी ठरतोय. तो 63 धावांवर तुफानी फलंदाजी करत आहे. त्याला मिचेल मार्श साथ देत आहे. पर्थ कसोटी जिंकण्यासाठी भारताने यजमानांसमोर 534 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Two wickets and a Travis Head fifty this morning in Perth 🏏
India are five wickets away from a Test win 👉 https://t.co/FIh0brqKuj #AUSvIND pic.twitter.com/AlOuTky4GX
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)