आज आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 मधील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाची (Team India) टक्कर नामिबियाशी (Namibia) आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ (Indian Team) क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला तेव्हा सर्व खेळाडूंनी हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. देशाला अनेक महान खेळाडू देणारे प्रशिक्षक तारक सिन्हा (Tarak Sinha) यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय खेळाडूंनी ही काळी पट्टी बांधली आहे. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक सिन्हा यांचे शनिवारी निधन झाले.
#TeamIndia is wearing black armbands today to pay their tributes to Dronacharya Awardee and widely respected coach Shri Tarak Sinha, who sadly passed away on Saturday.#T20WorldCup #INDvNAM pic.twitter.com/U2LHEtsuN9
— BCCI (@BCCI) November 8, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)