महिला प्रीमियर लीगचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जात आहे. आरसीबीचे कर्णधारपद स्मृती मंधानाकडे तर दिल्लीचे कर्णधारपद मेग लॅनिंगकडे आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 2 बाद 223 धावा केल्या आहेत. आरसीबीला विजयासाठी 224 धावा कराव्या लागतील. सलामीवीर शेफाली वर्मा आणि मेग लॅनिंग यांनी शानदार फलंदाजी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 91 चेंडूत 162 धावांची भागीदारी केली. शेफाली 45 चेंडूत 84 धावा करून बाद झाली. तिने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 4 षटकार मारले. कर्णधार मेग लॅनिंगने 43 चेंडूत 72 धावांची खेळी केली. यादरम्यान 14 चौकार मारले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)