Gujarat Titans vs Mumbai Indians: आयपीएल 2025 (IPL 2025) नववा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Gujarat Titans vs Mumbai Indians) यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद (Narendra Modi Stadium, Ahmedabad) येथे खेळवला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभव करुन विजयाची नोंद केली आहे. मुंबईचा हा सलग दुसरा पराभव आहे. त्याआधी, मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातने मुंबईसमोर 197 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईचा संघ 20 षटकात 6 गडी गमावून 160 धावा करु शकला. आता गुजरात टायटन्सच्या पहिल्या विजयासह, पॉइंट्स टेबलमध्ये मोठे बदल दिसू लागले आहेत. दरम्यान, गुजरातने हा सामना जिंकून तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे, तर मुंबई नवव्या स्थानावर आहे. तसेच, आरसीबी पहिल्या, लखनौ दुसऱ्या आणि पंजाबची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे.
- 5 time Champions CSK at 8.
- 5 time Champions MI at 9. pic.twitter.com/nfPPijhQS6
— Johns. (@CricCrazyJohns) March 29, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)