राष्ट्रकुलमध्ये 2022 (Commonwealth Games 2022) क्रिकेटचे  पुनरागमन झाल्यानंतर ऑलिम्पिकमध्ये (Olympics) क्रिकेटचा समावेश करण्याची चर्चा जोरात आली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती 2028 च्या ऑलिम्पिक आवृत्तीमध्ये क्रिकेटसह इतर आठ खेळांच्या समावेशाचा आढावा घेईल. 2028 मध्ये ऑलिम्पिक खेळ लॉस एंजेलिस येथे होणार आहेत. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या आयोजन समितीने आयसीसीला (ICC) आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करायचा की नाही याचा अंतिम निर्णय 2023 मध्ये होईल. ICC आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या प्रयत्नांमुळे 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)