आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिसची बॅट (Faf duPlessis) आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. त्याने 24व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 64 धावांची कर्णधारी खेळी खेळली, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. मात्र, या खेळीच्या जोरावर त्याला ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मोठा फायदा झाला आहे. केकेआरचा अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यरकडून फॅफने ही कॅप हिसकावून घेतली आहे. आता डुप्लेसिसने 5 सामन्यात 259 धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या यादीत त्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. तिसऱ्या क्रमांकावर पंजाब किंग्जचा कर्णधार धवनचे नाव आहे, ज्याने 5 सामन्यात 233 धावा केल्या आहेत. शुभमन गिल 228 धावांसह चौथ्या क्रमांकावर कायम आहे. डेव्हिड वॉर्नर पाचव्या क्रमांकावर आहे, ज्याने आतापर्यंत 5 सामन्यात 228 धावा केल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)