ENG vs NZ Series 2022: जेम्स अँडरसन (James Anderson) आणि स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) यांना 2 जूनपासून सुरु होणाऱ्या न्यूझीलंड (New Zealand) विरुद्धच्या आगामी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडच्या कसोटी संघात (England Test Team) पुन्हा संधी देण्यात आली आहे. लक्षणीय आहे की या वर्षाच्या सुरुवातीला बोथम-रिचर्ड्स ट्रॉफीसाठी (Botham-Richards Trophy) दोन्ही अनुभवी वेगवान गोलंदाजांना वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेल्या इंग्लंड संघातून वगळण्यात आले होते. तथापि, ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झालेल्या ऍशेस संघाचा ते भाग होते. इंग्लंडच्या निवड समितीने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी 13 सदस्यीय संघाची घोषणा केली.
Our first squad of a huge summer 🏏
Sign in now to see our 13-strong squad to take on New Zealand
🏴 #ENGvNZ 🇳🇿
— England Cricket (@englandcricket) May 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)