MS Dhoni Dance Video: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल (MS Dhoni) चाहत्यांच्या मनात वेगळीच प्रतिमा आहे. चाहते त्याला एक गंभीर व्यक्ती मानतात जो कधीही कोणत्याही पार्टीत जात नाही. तसेच तो कधीही कोणत्याही खेळाडूच्या पार्टीत दिसत नाही. जेव्हा आयपीएल सुरू होते तेव्हा रात्री उशिरापर्यंत पार्ट्या होणे ही सामान्य गोष्ट होती, पण त्या पार्ट्यांमध्ये धोनी कधीच दिसला नाही. मात्र, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी दुबईत हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पंड्यासोबत (Krunal Pandya) पार्टी करताना दिसत आहे. धोनीसोबत त्याची पत्नी साक्षी आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची मुलगी पूर्णा पटेलही होती.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)