आशिया कप 2022 (Asia Cup 2022) यूएईमध्ये (UAE) 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे. याचे यजमानपद श्रीलंका क्रिकेट बोर्डाला दिले आहे, ज्यामध्ये एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. टीम इंडिया 28 तारखेला पाकिस्तानविरुद्ध (IND vs PAK) पहिला सामना खेळणार आहे. तसेच या आशिया कप झाल्यानंतर भारताला टी-20 विश्वचषक खेळायचा आहे. नुकताच मिळालेल्या माहितीननुसार, बीसीसीआयने भारताचा माजी कर्णधार श्री महेंद्रसिंग धोनीवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्वीट करुन सांगितले आहे की, आशिया चषक आणि T20I विश्वचषकासाठी टीम इंडियाचा मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना धोनीची टीम इंडियात जलवा पाहायला मिळणार आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)