DC vs CSK, IPL 2024, Match 13: इंडियन प्रीमियर लीग 2024 चा (IPL 2024) 13 वा सामना आज म्हणजेच 31 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (DC vs CSK) यांच्यात होणार आहे. विशाखापट्टणम येथील डॉ वायएस राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही संघांमधील सामना सुरू होईल. दिल्ली कॅपिटल्ससाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आतापर्यंत त्यांची सुरुवात खूपच खराब झाली आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. त्याच वेळी, ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सला हंगामातील पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. तुम्ही जिओ सिनेमावर ऑनलाइन स्ट्रीमिंग पाहू शकता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)