विश्वचषक 2023 चा (ICC World Cup 2023) पहिला उपांत्य सामना आज भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. सर्व 9 लीग सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाचे मनोबल उंचावले आहे, तर न्यूझीलंड पुन्हा एकदा टीम इंडियासमोर आपले आव्हान सादर करणार आहे. आजपर्यंत टीम इंडियाला उपांत्य फेरीसारख्या मोठ्या सामन्यात किवी संघाविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. पण यावेळी टीम इंडियाची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण उत्कृष्ट राहिल्याने आज टीम इंडियाला हा विक्रम सुधारून अंतिम फेरी गाठण्याची सुवर्णसंधी आहे. दरम्यान, भारताने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्तपुर्वी, मुंबईत आयसीसी विश्वचषक 2023 च्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा सामना करताना जम्मूमधील CRPF जवानांनी टीम इंडियाचा उत्साह वाढवला आणि 'भारत माता की जय' असा जयजयकार केला. (हे देखील वाचा: Most World Cup Sixes: 'हिटमॅन' Rohit Sharma चा विश्वचषकात मोठा पराक्रम, ठरला सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज)
#WATCH | ICC World Cup | CRPF jawans in Jammu cheer for Team India as it takes on New Zealand in the first semi-final match of ICC World Cup 2023, in Mumbai.#IndiaVsNewZealand pic.twitter.com/infMPwBKEO
— ANI (@ANI) November 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)