भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी बोली लावण्याची तयारी केल्यामुळे 2025 मध्ये महिलांच्या 50 षटकांच्या विश्वचषकाचे यजमानपद भारताला मिळाले आहे. भारताची बोली यशस्वी झाल्यामुळे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (ICC) सर्वोच्च स्पर्धा दशकाहून अधिक काळानंतर भारतात परत येणार आहे. भारताने शेवटचे 2013 मध्ये महिलांच्या 50 षटकांच्या विश्वचषकाचे आयोजन केले होते आणि त्यानंतर मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा 114 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले होते. यावर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले आम्ही आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 च्या यजमानपदासाठी उत्सुक होतो आणि या चषकाचे यजमान भारताला मिळाल्यामुळे आम्ही खुप आंनदी आहोत.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)