भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहालीत होत आहे. विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताला आपल्या बेंच स्ट्रेंथची चाचणी घ्यायची आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करेल. भारताने हा सामना जिंकल्यास तो वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचेल. भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलिया संघाने भारतासमोर धावांचे 276 लक्ष्य ठेवले आहे. डेविड वॉर्नरने अर्धशतक ठोकले. भारताकडून शामीने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या.
1ST ODI. WICKET! 49.6: Adam Zampa 2(2) Run Out Ravindra Jadeja, Australia 276 all out https://t.co/F3rj8GI20u #INDvAUS @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) September 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)