सोशल मिडीयावर सध्या एक व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला विहिरीतून अजगराला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना पहायला मिळत आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील बुलढाणा गावातला आहे. ज्या गावातील एक शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये एक मोठा अजगर दिसल्याची घटना घडली. विहिरीमध्ये अजगर ला पाहताच शेतकरी खुप घाबरला आणि गावातील इतरांना त्याने याबद्दल सांगितले तेव्हा त्याला सर्प मित्र किंवा वन विभागातील लोकांना बोलवण्याचा सल्ला दिला गेला. त्यानुसार शेतकऱ्याने सर्प मित्र महिलेला बोलावले. त्यानंतर महिला सर्प मित्र वनिता यांनी धिटाइने अगजराला बाहेर काढले. पहा व्हिडिओ.  (लहान मुलीच्या गळ्याभोवती किंग कोबरा चा 2 तास वेढा नंतर चावा; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल)

विहिरीतून अजगराला बाहर काढण्यासाठी सर्प मित्र महिलेला बरीच वेळ म्हणत करावी लागली.मात्र बऱ्याच वेळानंतर अखेर अजगरला पकडण्यात यश आले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)