Pet Dog Drags Woman Owner: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गाझियाबाद येथील एका पॉश सोसायटीमध्ये पाळीव कुत्र्याने अल्पवयीन मुलीवर हल्ला करून तिच्या हातावर चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुत्र्याचा मालक तिथे उपस्थित असतानाही पाळीव कुत्र्याने अल्पवयीन मुलीवर हल्ला केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. जेव्हा कुत्र्याने मुलीवर हल्ला केला तेव्हा कुत्र्याच्या मालकाला पाळीव प्राण्यावर नियंत्रण ठेवता आले नाही. गाझियाबादच्या राज एक्स्टेंशन रोडजवळ असलेल्या अजनारा इंटिग्रिटी सोसायटीमध्ये ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पहा व्हिडिओ - 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)