Yoga In Local Train: 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबई लोकलमधील प्रवासी रेल्वे ट्रेनच्या डब्यात योगासने करताना दिसले. मुंबईकर लोकल ट्रेनमध्ये योगासने करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गेल्या वर्षीही योग दिनानिमित्त असेच व्हिडिओ व्हायरल झाले होते. 2022 मध्ये, पश्चिम रेल्वेच्या संयुक्त विद्यमाने Heal Station नावाच्या संस्थेने ट्रेनमध्ये योग करण्याची मोहीम सुरू केली. प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचा वेळ फिटनेससाठी वापरता यावा यासाठी त्यांना साधी योगासने शिकवण्यात आली. संयुक्त राष्ट्रांनी घोषित केल्याप्रमाणे, 21 जून हा दरवर्षी 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या योग दिनाची थीम 'वसुधैव कुटुंबकम' म्हणजेच 'एक विश्व-एक कुटुंब' अशी आहे. (हेही वाचा - No Fire Safety In Local Trains: मुंबई लोकल ट्रेनमध्ये अग्निसुरक्षा सुविधांचा अभाव; CCRS च्या वार्षिक अहवालात धक्कादायक खुलासा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)