Nude Woman On Road: कॅलिफोर्नियामध्ये मंगळवार, 25 जुलै रोजी एका धक्कादायक घटनेत, एक नग्न महिला तिच्या कारमधून उतरली आणि तिने बंदुकीने गोळीबार करण्यास सुरुवात केली. देशातील सर्वात वर्दळीच्या पुलावर ही घटना घडली. ही महिला अचानक रस्त्याच्या मधोमध थांबली. ती गोळीबार करत ओरडत होती. यानंतर महिला कारमध्ये बसली आणि ओकलंडच्या दिशेने निघाली. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, ती पुन्हा एका टोल प्लाझावर थांबली आणि नग्न अवस्थेत कारमधून बाहेर पडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर तिने कारवर बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली. व्हिडिओमध्ये ती रस्त्यावरून चालताना आणि हवेत गोळ्या झाडताना दिसत आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या महिलेला ताब्यात घेतले.

या घटनेमागचा महिलेचा हेतू स्पष्ट झालेला नाही, सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. या महिलेला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले असून तिची मानसिक आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महिलेवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)